ZP Exam Revised Timetable Declared :- महाराष्ट्र राज्याच्या विविध जिल्हापरिषदेमार्फत विविध संवर्गासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले होते. त्या साठी ची परीक्षा IBPS या नामांकित संस्थेमार्फत घ्यात येत आहे. दिनांक 18 ऑक्टोबर ते 23 ऑक्टोबर पर्यंतची काही संवर्गाच्या ऑनलाइन परीक्षा संस्थेमार्फत काही कारणास्तव रद्द करण्यात आली आहे. परंतु आता IBPS संस्थेमार्फत कनिष्ठ अभियंता (स्थापत्य / ग्रामीण पाणी पुरवठा / लघु पाटबंधारे) इत्यादी संवर्गाच्या परीक्षेचे सुधारित वेळापत्रक जिल्हा परिषदेमार्फत जाहीर करण्यात आले असून सदर परीक्षा दिनाक 17 नोव्हेंबर 2023 ते 20 नोव्हेंबर 2023 या कालावधीत तसेच वरिष्ठ सहायक या पदाची परीक्षा 23 नोव्हेंबर 2023 या दिवशी घेण्यात येणार असल्याचे विविध जिल्हापरिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
सूचना- कृपया आपण ज्या जिल्हापरिषदेच्या संवर्गासाठी अर्ज केला असेल त्या जिल्हा परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन स्वतः खात्री करून घेणे आवश्यक आहे. येथे आम्ही फक्त आपल्या माहितीसाठी हे वेळापत्रक (लातूर) चे उपलब्ध करून देत आहोत.