
शेतीला दिवसा पाणी देण्यासाठी महाराष्ट्र ऊर्जा विकासअभिकरणामार्फत (महाऊर्जा )राबवण्यात येणाऱ्या ‘पंतप्रधान कुसुम’ PM KUSUM योजनेतून सौर ऊर्जा कृषी पंप घेण्यासाठी राज्यभरातून 23 584 शेतकऱ्यांचे अर्ज प्राप्त झाले आहे. एकाच वेळी अनेक शेतकरी महा ऊर्जा पासून योजनेच्या संकेतस्थळावर अर्ज करत असल्याने त्यावर प्रक्रिया होण्यास विलंब लागत आहे. त्या पार्श्वभूमीवर सर्व शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता यावा यासाठी महाऊर्जाकडून जिल्हा निहाय कोटा वाढवून देण्यात येत आहे. शेतीचे सिंचन करणाऱ्या कृषी पंपांना सौरऊर्जेचे बळ देण्यासाठी केंद्र सरकारकडून पंतप्रधान किसान ऊर्जा सुरक्षा व उत्थान योजना PM KUSUM (पीएम कुसुम) राबवली जात आहे. त्या अंतर्गत केंद्रीय नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाने Ministry Of New And Renewable Energy Government of India. राज्यात दरवर्षी एक लाख याप्रमाणे आगामी पाच वर्षात पाच लाख सौर कृषी पंप बसविण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. या योजनेत सर्वसाधारण प्रवर्गातील शेतकऱ्याला सौर कृषी पंपाच्या किंमतीच्या 90 टक्के व अनुसूचित जाती जमातीच्या प्रवर्गातील शेतकऱ्याला सौर कृषी पंपाच्या किंमतीच्या 95 टक्के अनुदान देण्यात येते. त्यासाठी महाऊर्जामार्फत 17 मे पासून कुसुम योजनेचे संकेतस्थळ कार्यान्वित करण्यात आले ( येथे क्लिक करा) असून जिल्ह्याच्या लोकसंख्येनुसार उपलब्ध होतात. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य First Come First Served या तत्त्वावर सौर कृषी पंप उपलब्ध करून दिले जात आहेत. त्याला शेतकऱ्यांचा उदंड प्रतिसाद लाभत असून एकाच वेळी अनेक शेतकरी अर्ज करत असल्याने संकेतस्थळ ठप्प होत आहे त्यामुळे शेतकऱ्याकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर महाऊर्जामार्फत संकेतस्थळाचा दररोज आढावा घेऊन जिल्हा निहाय कोटा वाढवून दिला जात आहे. त्यामुळे सौर कृषी पंपाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना कोटा उपलब्ध झाल्यावर अर्ज करण्याचे आवाहन महाऊर्जाचे महासंचालक रवींद्र जगताप यांनी केले आहे.
बनावट संकेतस्थळापासून सावधान
शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना सौर ऊर्जेच्या माध्यमातून वीजपुरवठा करण्यासाठी राज्य सरकारकडून पीएम कुसुम योजनेला गती दिली जात आहे. या योजनेतून शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीच्या आकाराच्या तीन, पाच आणि साडेसात अश्वशक्ति क्षमतेचे पारेषणविरहित सौर कृषी पंप देण्यात येत आहेत. अडीच एकर पर्यंत शेतीसाठी तीन अश्वशक्ति पाच एकर शेतीसाठी पाच अश्वशक्ति व त्यापेक्षा जास्त शेतजमीन धारकाला साडेसात अश्वशक्ति क्षमतेचे व त्यापेक्षा जास्त शेत जमीन धारकाला साडेसात अश्वशक्ती क्षमतेचे सौर कृषी पंप दिले जातात. त्यासाठी शेतकऱ्यांनी महाऊर्जाच्या संकेतस्थळावरूनच ऑनलाईन अर्ज करावा ( येथे क्लिक करा) इतर कोणत्याही बनावट किंवा फसव्या संकेतस्थळाचा वापर करू नये तसेच अर्ज करताना येणाऱ्या अडचणींबाबत 02035000456 किंवा 02035000457 या क्रमांकावर तक्रार नोंदवावी असे आवाहनही महाऊर्जाने केले आहे
असा आहे लाभार्थ्यांचा हिस्सा
पंपाची क्षमता | पंपाची किंमत जीएसटी सह (रुपयांमध्ये) | सर्वसाधारण प्रवर्गाचा हिस्सा (दहा टक्के) | अनुसूचित जाती अनुसूचित जमाती प्रवर्गाचा हिस्सा (पाच टक्के ) |
3 HP | रु 1,93,803 | रु 19,380 | रु 9,690 |
5 HP | रु 2,69,746 | रु 26,975 | रु 13,488 |
7.5 HP | रु 3,74,402 | रु 37,440 | रु 18,720 |