PM Kisan Yojana :-पंतप्रधान शेतकरी सन्मान पीएम किसान निधी योजनेचे काम महसूल विभागाकडून कृषी विभागाकडे आल्यानंतर पहिल्याच टप्प्यात साडेचार लाख शेतकऱ्यांची नोंदणी वाढली आहे त्यामुळे राज्यातील यंदा 85 लाख 55 हजार शेतकऱ्यांना या योजनेचे अनुदान मिळणार आहे
पीएम किसान चे काम आधी महसूल विभागाकडे होते परंतु या विभागाने कामावर बहिष्कार टाकला त्यातून लाखो शेतकऱ्यांना लाभपासून वंचित राहावे लागले होते ‘हे काम आमचे नसून कृषी विभागाची आहे’ अशी भूमिका महसूल ची होती हा वाद मुख्य सचिव यांच्या पर्यंत गेला व कृषी विभागाला नमते घ्यावे लागले.
नव्या कार्यपद्धतीनुसार तालुका कृषी अधिकारी मार्फत केंद्र शासनाच्या संकेतस्थळावर या योजनेची नोंदणी करण्याची सुविधा देण्यात आली आहे शेतकरी संकेतस्थळावर स्वयं नोंदणी ही करू शकतात परंतु ही केवायसी करणे तसेच बँक खाते आधार सोबत संलग्न करण्याची जबाबदारी शेतकऱ्यांवर देण्यात आलेली आहे दुर्गम भागातील शेतकऱ्यांना ही दोन्ही कामे करणे शक्य नव्हते त्यामुळे कृषी विभागाच्या क्षेत्रीय कर्मचाऱ्यांनी राज्यभर अभियान घेतले त्यामुळे 4.56 लाख शेतकऱ्यांची ई केवायसी झाली तसेच 5.10 लाख शेतकऱ्यांचे बँक खाते आधार संलग्न होऊ शकले हे केवळ कृषी विभागाचे शेतकरी कर्मचाऱ्यांचे परिश्रमामुळे साध्य झाले आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे तसेच नोंदणीकृत शेतकऱ्यांना यंदा चौदावा हप्ता येथे 27 जुलै मिळणार आहे
थेट छत्तीसगड मध्ये घेतला मेळावा
पीएम किसान मध्ये नोंदणी वाढविण्यासाठी कृषी विभागाच्या शेती कर्मचाऱ्यांनी खेडेपाडे पिंजून काढले आहेत राज्याच्या सीमावरती भागातील शेतकरी कामानिमित्त परराज्यात गेलेले असतात अश्या शेतकऱ्यांशी संपर्क करून त्यांची नोंदणी केली गेली विशेष म्हणजे गोंदिया जिल्ह्यातील अनेक शेतकरी छत्तीसगडमध्ये होते त्यांच्याशी संपर्क साधत थेट छत्तीसगडमध्ये जाऊन नोंदणी केली त्यामुळे यंदा या योजनेचा लाभ मिळणाऱ्या गरीब शेतकऱ्यांची संख्या लाखाच्या पटीत वाढणार आहे