Pimpri Chinchwad Municipal Corporation Walk In Interview.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या PCMC अस्थाई आस्थापनेवरील गट क मधील खालील पदे फक्त सहा महिने कालावधी करिता दरमहा एकत्रित मानधनावर तात्पुरत्या स्वरूपात भरावयाची आहेत.
गट क संवर्गातील पदे भरणे बाबतची सविस्तर जाहिरात करता आरक्षणाचा तपशील अटी शर्ती तसेच त्या अनुषंगाने इतर सर्व आवश्यक माहिती पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तरी इच्छुक उमेदवारांनी विविध अर्जासह विहित अर्जासह Walk in Interview करिता 9 जून2023 रोजी सकाळी दहा वाजता, दिवंगत मधुकर पवळे सभागृह, तिसरा मजला, पिंपरी चिंचवड महानगरपालिका मुख्य इमारत, पिंपरी. येथे मूळ कागदपत्रांसहित उपस्थित राहावे. तसेच आलेल्या उमेदवारांची नोंदणी मुलाखतीच्या दिवशी सकाळी दहा ते अकरा या वेळेत केले जाईल. वेळेनंतर आलेल्या उमेदवारांची नोंदणी केली जाणार नाही
मानधन व पदसंख्या खालील प्रमाणे आहे
1. आरोग्य निरीक्षक दर्जा निरीक्षक- 27000/- रुपये दरमहा
2.आरोग्य सहाय्यक- 26000/- रुपये दरमहा
मुलाखतीचे ठिकाण
दिवंगत मधुकर पवळे सभागृह तिसरा मजला पिंपरी चिंचवड महानगरपालिका मुख्य इमारत पिंपरी
दिनांक वेळ
9 जून2023 रोजी सकाळी दहा वाजता
अनुक्रमांक | पदनाम | शैक्षणिक अर्हता |
1 | निरीक्षक | 1. मान्यता प्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी असणे आवश्यक 2. शासनमान्य संस्थेकडे आरोग्यनिरीक्षक सॅनिटरी इन्स्पेक्टर पदविका उत्तीर्ण असणे आवश्यक 3. शासकीय अथवा निमशासकीय संस्थांमध्ये समकक्ष पदाच्या कामाचा किमान सहा महिन्यांचा अनुभव आवश्यक 4. मान्यता प्राप्त शासन संस्थेकडील संगणक अर्हता आवश्यक 5. मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक |
2 | आरोग्य सहाय्यक | 1. उच्च माध्यमिक शाळांत परीक्षा एचएससी असणे आवश्यक 2. शासनमान्य संस्थेकडील आरोग्य निरीक्षक सॅनिटरी इन्स्पेक्टर पदविका उत्तीर्ण असणे आवश्यक 3.शासकीय अथवा शासकीय संस्थांमधील समक्ष पदाच्या कामाचा किमान सहा महिन्याचा अनुभव आवश्यक 4.मान्यता प्राप्त शासन संस्थेकडील संगणक अर्हता आवश्यक 5. मराठी भाषेची ज्ञान आवश्यक |