पिंपरी-चिंचवड (PCMC) महापालिकेच्या सरळसेवा भरती २०२३ निकालाची तारीख जाहीर ।आपला निकाल येथे बघा.
PCMC Result Date Declared :-पिंपरी-चिंचवड (PCMC) महापालिकेच्या विविध विभागांतील ‘ब’ आणि ‘क’ गटातील 15 पदांच्या 388 जागांसाठी मे मध्ये घेतलेल्या परीक्षेचा निकाल 15 ऑगस्टपूर्वी जाहीर करण्यात येणार असल्याचे महानगरपालिकेतर्फे सांगण्यात आले आहे.
महापालिकेच्या विविध विभागांतील जागांसाठी मे मध्ये राज्यातील 26 शहरातील 98 केंद्रांवर 55 हजार 82 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. पालिकेने अतिरिक्त कायदा सल्लागार, विधी अधिकारी, उप मुख्य अग्रिशमन अधिकारी, विभागीय अग्रिशमन अधिकारी, उद्यान अधिक्षक (वृक्ष), उद्यान निरिक्षक, हॉर्टीकल्चर सुपरवायझर, कोर्ट लिपिक, ऍनिमल किपर, समाजसेवक, आरोग्य निरिक्षक, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता (विद्युत), लिपिक या पदांसाठी परीक्षा घेतली होती. परीक्षेनंतर उमेदवारांच्या हरकती मागविण्यात आल्या होत्या.
या जाहिरातीमधील मधील 11 पदांच्या 35 जागांबाबत आलेल्या हरकतींचा निपटारा झाला आहे. त्यामुळे 4 हजार 233 विद्यार्थ्यांचा येत्या आठ दिवसात निकाल जाहीर करण्यात येणार आहे. तर स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता (विद्युत), लिपिक या चार पदांवरील हरकत घेण्याची मुदत संपली आहे.
STAFF SELECTION COMMISSION RECRUITMENT 2023 | 1324 JUNIOR ENGINEER POST
यामध्ये आलेल्या हरकतींवर टीसीएस कंपनीने (PCMC) निर्णय घेतला असून निकाल तयार करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. या चार पदांचा निकाल 15 ऑस्टपर्यंत लावण्यात येणार असल्याची माहिती सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त विठ्ठल जोशी यांनी एका स्थानिक वृत्तसंस्थेला दिली.
Application for electrical engineering post
as per pcmc notification, Result will be announced within 15 days.