पिंपरी चिंचवड मनपात विविध 327 पदांची भरती | PCMC Bharti 2024 |
PCMC Bharti 2024 : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये शिक्षण विभागामार्फत विविध पदे भरण्यासाठी नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून एकूण 327 पदांसाठी ही भरती प्रकिया राबविण्यात येत आहे.
या भरती प्रक्रियेमध्ये विविध पदाचा समावेश असून सविस्तर जाहिरातस अनुसरून इच्छुक तसेच पात्र उमेदवाराने 01 एप्रिल 2024 पासून ते 26 एप्रिल 2024 सकाळी 10 ते संध्याकाळी 05 वाजेपर्यंत समक्ष अर्ज ( Offline ) सादर करायचे आहेत.
या पदभरती मध्ये मराठी माध्यमाची एकूण 245, उर्दू माध्यमाची 66, तसेच हिंदी माध्यमाची एकूण 16 पदे रिक्त पदाची भरती करण्यात येत असून सविस्तर जाहिरात संवर्ग निहाय आरक्षण, अर्जाचा नमुना खाली दिलेल्या लिंक वर बघू शकता.
अर्ज कसा करावा- ऑफलाईन पद्धतीने
पात्रता- कृपया सविस्तर जाहिरात पहावी.
अर्ज करावयाचा कालावधी- 01 एप्रिल 2024 ते 26 एप्रिल 2024 सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत.
अर्जासोबत जोडवायची कागदपत्रे:-
शाळा सोडल्याचा दाखला, धारण केलेले शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता त्याचे प्रमाणपत्र, पदविका डीएड, बीएड, पदवी प्रमाणपत्र व गुणपत्रिका, अनुभव प्रमाणपत्र तसेच इतर आवश्यक कागदपत्राच्या सत्यप्रती सादर करणे बंधनकारक असेल.
अर्ज कुठे करावा:-
मा. अतिरिक्त आयुक्त-1, पिंपरी चिंचवड महानगरपालिका जुना “ड” प्रभाग कार्यालय, कर्मवीर भाऊराव पाटील मनपा प्राथमिक शाळा, पिंपरी गाव. पुणे 19.
अधिकृत संकेतस्थळ :- येथे क्लिक करा
सविस्तर जाहिरात:- येथे क्लिक करा
अर्जाचा नमुना :- येथे क्लिक करा