Panvel Municipal Corporation Bharti 2023 | Timeline Extension For Filling Form
पनवेल महानगरपालिकेच्या आस्थापना वरील गट अ ते गट ड मधील रिक्त असणाऱ्या पदांवर सरळ सेवा भरतीने जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. प्रस्तुत जाहिरातीमधील पदे ही प्रशासकीय, अभियांत्रिकी, तांत्रिक सेवा, यांत्रिकी सेवा, विधी सेवा, अग्निशमन सेवा, सुरक्षा सेवा, माहिती व तंत्रज्ञान सेवा, लेखा व वित्त सेवा, उद्यान सेवा, शहर विकास सेवा, सार्वजनिक आरोग्य सेवा, क्रीडा सेवा, वैद्यकीय सेवा, पशुवैद्यकीय सेवा, लेखा परीक्षण सेवा, इत्यादी सेवा मधील आहेत. प्रस्तुत भरतीसाठी पुरेसा प्रतिसाद प्राप्त होण्याकरिता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
जाहिरात क्रमांक 1/2023 नुसार गट अ ते गट ड मधील एकूण 377 पदांकरिता अर्ज करण्याचा कालावधी दिनांक 13 जुलै 2023 पासून ते दिनांक 31 ऑगस्ट 2023 पर्यंत होता. तो आता 15 सप्टेंबर 2023 रोजी इच्छुक उमेदवारांनी या पनवेल महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर दिनांक 15 सप्टेंबर 2023 या दिवशी रात्री 11.55 मिनिटांपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावेत असे आवाहन महापालिकेतर्फे शुद्धीपत्रक 3 नुसार करण्यात आले आहे.
संपूर्ण जाहिरातीबद्दल माहिती खाली दिलेल्या वेबपेज वर उपलब्ध आहे.