NFL Bharti 2023: ‘नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेड’ मध्ये विविध पदांची भरती; आजच करा अर्ज
NFL Bharti 2023: ‘नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेड’ मध्ये विविध पदांची भरती; आजच करा अर्ज
NFL Bharti 2023: नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेड यांच्या अंतर्गत भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून या भरतीद्वारे मॅनेजमेंट ट्रेनी पदांच्या ७० हून अधिक रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. ०१ डिसेंबर ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. तेव्हा या भरती मधील पदे, पदसंख्या, पात्रता, वयोमर्यादा आणि इतर सर्व तपशील खालील प्रमाणे आहे
‘NFL Bharti 2023′ मधील पदे आणि पदसंख्या:
मॅनेजमेंट ट्रेनी (मार्केटींग) – ६० जागा
मॅनेजमेंट ट्रेनी (एफ अँड ए ) – १० जागा
मॅनेजमेंट ट्रेनी (लॉ) – ०४ जागा
एकूण रिक्त पदसंख्या – ७४ जागा
शैक्षणिक पात्रता:
1)मार्केटिंग :मार्केटिंग/ ऍग्री बिजनेस मार्केटिंग/ रूरल मॅनेजमेंट/ फॉरेन ट्रेड इंटरनेशनल मार्केटिंग आदी विषयात ६० टक्के गुणांसह एमबीए/ पीजीडीबीएम/ पीजीडीएम.
2)एफ अँड ए: सीए/ आयसीडब्ल्यूए / सीएमए आदी परीक्षा उत्तीर्ण.
3)लॉ : पूर्णवेळ तीन वर्षांचा एलएलबी अभ्यासक्रम ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण.
वयोमर्यादा: किमान वय १८ तर कमाल वय २७ वर्षे आहे. कमाल वयोमर्यादेत ओबीसी प्रवर्गाला ३ वर्षे तर मागासवर्गीय प्रवर्गाला ५ वर्षे सूट आहे.
अर्ज शुल्क: या भरतीसाथी ७०० रुपये अर्जशुल्क अर्ज राखीव प्रवर्गातील उमेदवारांना शुल्क माफ आहे.
नोकरीचे ठिकाण: संपूर्ण भारत.
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: १ डिसेंबर २०२३