| FSSAI Bharti 2024: सहायक संचालक आणि प्रशासकीय अधिकारी पदांची भरती अंतिम दिनांक 14 जुलै 2024    | IBPS Clerk Recruitment 2024: Apply Now for Over 6128 Vacancies in Top Indian Banks! -अंतिम दिनांक 21 जुलै 2024    |MahaTransco Engineer Recruitment 2024 | महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीत विविध पदांसाठी अर्ज करा- अंतिम दिनांक 31 जुलै 2024    | कारागृह विभागात लिपिक पदासह अन्य पदाची भरती- अंतिम दिनांक 21 जानेवारी 2024
Join Our WhatsApp Group!

MIDC भरती 2023 परीक्षेचे अ.शुल्क होणार परत । MIDC Bharti 2023 Exam Fee Refund 

MIDC Bharti 2023 Exam Fee Refund -महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने दिनांक 14/ 8 /2023 रोजी सरळ सेवा भरतीसाठी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीच्या अनुषंगाने दिनांक 2/9/2023 पासून ऑनलाईन अर्ज सादर करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. ऑनलाइन अर्ज प्रक्रियेमध्ये खुला प्रवर्गातील उमेदवाराकडून रुपये 1000 अधिक रुपये 180 जीएसटी रक्कम असे एकूण 1180 तसेच मागासवर्गीय /आर्थिक दुर्बल घटक/ अनाथ/ दिव्यांग या प्रवर्गातील उमेदवाराकडून रुपये 900 अधिक रुपये 162 जीएसटी रक्कम असे एकूण 1062 इतकी रक्कम आकारण्यात येत आहे. महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय क्रमांक प्राणिमा १२२३/प्र क १४/का.१३-अ, दिनांक 14 फेब्रुवारी 2023 नुसार स्पर्धा परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेताना कंपन्यांना द्यावयाची रक्कम ,कर, प्रशासकीय खर्च मिळवून प्रति उमेदवार रुपये 1000 इतके परीक्षा शुल्क आकारण्यात यावे तसेच , परीक्षा शुल्कात राखीव प्रवर्गासाठी 10% सवलत असे निर्देश दिलेले आहेत.

    ऑनलाईन अर्ज प्रक्रियेमध्ये खुला प्रवर्गातील उमेदवारांकडून 180 व मागासवर्गीय /आर्थिक दुर्बल घटक/ अनाथ/ दिव्यांग या प्रवर्गातील उमेदवारांकडून रुपये 162 इतकी अतिरिक्त रक्कम आकारण्यात येत आहे. याबाबत ऑनलाईन स्पर्धा परीक्षा घेणाऱ्या संस्थेशी संपर्क केला असता त्यांनी सद्यस्थितीमध्ये आकारण्यात येणाऱ्या अतिरिक्त रकमेबाबत बदल करायचा झाल्यास अर्जभरावयाच्या लिंक मध्ये तांत्रिक अडचणी निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे व त्यामुळे ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारण्यामध्ये काही तांत्रिक अडचण निर्माण होऊ नये म्हणून ऑनलाईन अर्ज सादर करण्याची विहित मदत संपल्यानंतर उमेदवाराकडून महामंडळाकडे जमा केले अतिरिक्त जीएसटी रक्कम संबंधित उमेदवाराच्या बँक खात्यामध्ये जमा करणे बाबतचा सल्ला सदर संस्थांनी दिला आहे त्यानुसार अर्ज सादर करणाऱ्या उमेदवाराकडून महामंडळाकडे जमा झालेली होणारी अतिरिक्त जीएसटी रक्कम अर्ज भरण्याची मुदत संपल्यानंतर दिनांक 25/ 9/ 2023 नंतर एक महिन्यांमध्ये संबंधित उमेदवारांना ज्या बँक खात्यातून रक्कम अदा केली आहे त्याच बँकांमध्ये जमा करण्यात येणार असल्याचे श्री तुषार मठकर महाव्यवस्थापक, मनुष्यबळ विकास, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. सदर प्रसिद्धीपत्रक खाली दिलेल्या लिंक वर उपलब्ध असून महामंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. -MIDC Bharti 2023 Exam Fee Refund 

MIDC Recruitment 2023 | Group A,B,C | Total Post 802

Leave a comment