Marathi Vishwakosh Nirmiti Mandal Recruitment 2023 | मराठी विश्वकोश निर्मिती मंडळामध्ये विविध पदांची भरती 2023
महाराष्ट्र शासन मराठी भाषा विभागाच्या अधिनस्त असलेल्या महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश मध्ये मंडळाच्या मुंबई व वाई कार्यालयाच्या आस्थापने वरील भूतपूर्व दुय्यम सेवा मंडळाच्या कक्षेतील गट क संवर्गातील संपादकीय सहायक , ग्रंथालयीन सहायक, व गट ड संवर्गातील शिपाई ही रिक्त पदे सरळसेवेने भरण्याकरिता सदर पदासाठी पात्र उमेदवाराकडून या www.marathivishwakosh.org संकेतस्थळावर फक्त ऑनलाईन पद्धतीने दिनांक 2 /12 /2013 ते दिनांक 21 /12 /2013 या कालावधीत अर्ज मागविण्यात येत आहेत सदर पदावरील भरती करता ऑनलाइन परीक्षा मुंबई व मुंबई उपनगर या परिसरातील ठिकाणी नेमून दिलेल्या केंद्रांवर घेण्यात येईल ऑनलाइन परीक्षेची तारीख www.marathivishwakosh.org या संकेतस्थळावर यथावकाश प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
पदनाम व एकूण पदे-
संपादकीय सहायक- 04
ग्रंथालयीन सहायक-01
शिपाई – 04
एकूण पदसंख्या-09
वेतन संरचना-
संपादकीय सहायक –
एस 10 :-29 हजार 200 ते 92 हजार 300 अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे इतर ध्येय भत्ते
ग्रंथालयीन सहायक
एस 7:-21 हजार 700 ते 59 69 हजार 100 अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे इतर ध्येय भत्ते
शिपाई
एस 1:- 15000 ते 47 हजार 600 अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे इतर दिले भत्ते
वयोमर्यादा
जाहिरातीत नमूद केलेल्या पदांसाठी अर्ज करण्याचा उमेदवाराचे वय दिनांक 21 डिसेंबर २०२३ रोजी करण्यात येईल संपादकीय सहाय्यक ग्रंथालय सहायक व शिपाई या पदासाठी किमान वय 18 वर्षे पूर्ण केलेला असावे व कमाल वय खुल्या प्रवर्गासाठी 40 वर्षापेक्षा जास्त नसावे आणि मागास प्रवर्गासाठी 45 वर्षापेक्षा जास्त नसावे
शैक्षणिक अर्हता व अनुभव
संपादकीय सहायक
1)मराठी विषयातील पदवी किमान द्वितीय श्रेणीमध्ये उत्तीर्ण असलेले
2)मराठी मधील संपादक या किंवा संशोधन कार्याचा किमान एक वर्षाचा प्रत्यक्ष अनुभव असलेले
ग्रंथालयीन सहायक
उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असणारे ग्रंथालय शास्त्रातील पदवी धारण केलेले आणि ग्रंथालय संचालनालयाचे ग्रंथपालाचे प्रमाणपत्र धारण केलेले
शिपाई
उमेदवारांने माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण केलेली असणे आवश्यक राहील
परीक्षा शुल्क
मागास प्रवर्गासाठी रुपये 900
खुल्या प्रवर्गासाठी रुपये 1000
अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा