Mahapareshan Bharti 2023 | Mahatransco Recruitment 2023 | महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण मध्ये विविध 2541 जागांसाठी भरती, लगेच करा अर्ज
Mahapareshan Bharti 2023 :-महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मध्ये विविध 2541 पदांची भरती सुरू झाली असून वरिष्ठ तंत्रज्ञ, तंत्रज्ञ श्रेणी 1/2 , विद्युत सहायक (पारेषण) इत्यादी पदांसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. सादर पदभरती साठी ऑनलाइन पद्धतीने दिनांक 20 नोव्हेंबर 2023 पासून सुरुवात होणार असून अंतिम दिनांक 10 डिसेंबर 2023 अशी आहे.
Mahapareshan Bharti 2023 | Mahatransco Recruitment 2023 -पद आणि पदसंख्या
वरिष्ठ तंत्रज्ञ -124
तंत्रज्ञ 1- 200
तंत्रज्ञ 2- 314
विद्युत सहाय्यक (पारेषण) -1903
एकूण पदसंख्या 2541
ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरु होण्याचा दिनांक- 20/11/23
ऑनलाईन पध्दतीने अर्ज नोंदणी करण्याचा अंतिम दिनांक- 10/12/23
Mahapareshan Bharti 2023 | Mahatransco Recruitment 2023 :-पद आणि शैक्षणिक पात्रता
पद शैक्षणिक पात्रता
वरिष्ठ तंत्रज्ञ –
शिकाऊ उमेदवारी कायदा-१९६१ अंतर्गत राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद (NCTVT), नवी दिल्ली यांनी प्रदान केलेले वीजतंत्री या व्यवसायातील राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी प्रमाणपत्र धारक असावा. तसेच 6 वर्षाचा अनुभव देखील असावा
तंत्रज्ञ 1
शिकाऊ उमेदवारी कायदा-१९६१ अंतर्गत राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद (NCTVT), नवी दिल्ली यांनी प्रदान केलेले वीजतंत्री या व्यवसायातील राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी प्रमाणपत्र धारक असावा
तसेच 4 वर्षाचा अनुभव देखील असावा
तंत्रज्ञ 2
शिकाऊ उमेदवारी कायदा-१९६१ अंतर्गत राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद (NCTVT), नवी दिल्ली यांनी प्रदान केलेले वीजतंत्री या व्यवसायातील राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी प्रमाणपत्र धारक असावा
तसेच 2 वर्षाचा अनुभव देखील असावा
विद्युत सहाय्यक (पारेषण)
शिकाऊ उमेदवारी कायदा-१९६१ अंतर्गत राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद (NCTVT), नवी दिल्ली यांनी प्रदान केलेले वीजतंत्री या व्यवसायातील राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी प्रमाणपत्र धारक असावा
पद आणि वयोमर्यादा
10 डिसेंबर 2023 रोजी,
खुला प्रवर्ग- 18 ते 38 वर्षे
मागास प्रवर्ग-18 ते 43 वर्षे
कृपया अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी मूळ जाहिरात नीट वाचावी व त्यानुसार अर्ज करावा.