Krushi Sevak Bharti 2023
Krushi Sevak Bharti 2023:- कृषी विभागाच्या अधिनस्त कार्यालयांच्या आस्थापनेवरील कृषी सहाय्यकांची रिक्त पदे कृषी सेवक म्हणून निश्चित वेतनावर भरणेसंदर्भातील सरळसेवा पेसा व नॉन पेसा पदभरतीसाठीची जाहिरात दि. ११.०८.२०२३ ते दि. १४.०८.२०२३ या कालावधीत विभाग स्तरावरून प्रसिध्द करण्यात आल्या. सदर जाहिरातीच्या अनुषंगाने दि. १४.०९.२०२३ ते दि.०३.१०.२०२३ या कालावधीत इच्छुक उमेदवारांकडून अर्ज भरण्याची कार्यवाही पूर्ण करण्यात आली आहे.
त्यानुषंगाने या प्रसिद्धीपत्रकाद्वारे कृषिविभागाद्वारे कळविण्यात येते की, कृषी सेवक पदभरती संदर्भातील ऑनलाईन परीक्षा आय.बी.पी.एस कंपनीमार्फत दि.१६ व १९ जानेवारी, २०२३ रोजी राबविण्यात येणार आहे. तसेच शासन पत्र दि. १८ ऑक्टोबर, २०२३ अन्वये पेसा क्षेत्रातील पदभरतीस निर्बंध असल्याने फक्त नॉन- पेसा क्षेत्रातील रिक्त पदांसाठी पदभरतीची कार्यवाही करण्यात येणार आहे. याची कृपया नोंद घ्यावी. परीक्षेसाठीचे प्रवेशपत्र यथावकाश आय.बी.पी.एस संस्थेकडून परिक्षार्थीना उपलब्ध करुन देण्याबाबतची कार्यवाही करण्यात येणार असल्याचे निवेदनाद्वारे प्रसिद्ध करण्यात आले आहे.
