ई- पीक पाहणी प्रकल्पाचे राज्य समन्वयक श्रीरंग तांबे यांनी एका वृत्तपत्रास दिलेल्या माहितीनुसार राज्यातील शेतकरी पिक पाहणी ची नोंदणी आज दिनांक 01 जुलै 2023 पासून करू शकणार आहेत
ई पीक पाहणी नोंदणी मोबाईलवर सुधारित एप्लीकेशन द्वारे करता येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना तलाठी कार्यालयात जाण्याची आता गरज राहणार नाही. खरीप हंगाम 2023 करिता राज्यातील शेतकरी नवे अँप्लिकेशन ‘2.0.11 पीक पाहणी अपडेटेड व्हर्जन‘ वापरू शकतील. त्यासाठी आधी मोबाईलमधील गुगल प्ले स्टोअरवर जाऊन नवे अँप्लिकेशन डाउनलोड करून घ्यावे लागेल. नव्या अँप्लिकेशनमुळे ई पीक पाहण्याची नोंदणी जलद व सुलभ पद्धतीने होईल. शासनाने ई पीक पाहणीच्या नोंदणीचा पर्याय शेतकऱ्यांना दिला असला तरी दुर्गम भागात शेतकऱ्यांमध्ये मोबाईल साक्षरता नसल्याने ई पीक पाणी तेथे होत नाही. अशा शिल्लक राहिलेल्या भागात शेतकरी आपापल्या भागातील तलाठ्याकडे जाऊन सातबारावर पीक पाहणी नोंदवून घेऊ शकतात.
महसूल विभागाने 15 ऑगस्ट 2021 पासून राज्यभर ईपीक पाहणीचा प्रकल्प सुरू केला असून खरीप व रब्बी हंगामात लक्षावधी शेतकरी पीक पाहणी करीत आहेत. आतापर्यंत राज्यातील 1 कोटी 88 लाख शेतकऱ्यांनी हे ॲप्लिकेशन डाऊनलोड करून नोंदणी केली असल्याचे श्री तांबे यांनी सांगितले.