India Post Bharti 2023 | इंडिया पोस्टमध्ये स्पोर्ट कोटा अंतर्गत मोठी भरती | १८९९ जागांवरील विविध पदांवर नोकरीची संधी
India Post Bharti 2023 : भारतीय टपाल विभागामार्फत नुकतीच तब्बल 1 हजार 899 रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. पोस्टल असिस्टंट, सॉर्टिंग असिस्टंट, पोस्टमन, मेल गार्ड आणि मल्टी टास्किंग स्टाफ इत्यादी पदाच्या जागांवर ही भरती करण्यात येणार असून दहावी पास, बारावी पास आणि पदवीधरांना या भरतीमध्ये अर्ज करता येणार आहेत. ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 डिसेंबर 2023 आहे
India Post Bharti 2023 पदभरतीचा तपशील :
एकूण रिक्त जागा : 1899
1)पोस्टल असिस्टंट
2)सॉर्टिंग असिस्टंट
3)पोस्टमन
4)मेल गार्ड
5)मल्टी टास्किंग स्टाफ
शैक्षणिक पात्रता :
पोस्टल असिस्टंट आणि सॉर्टिंग असिस्टंट पदासाठी :
मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेमधील पदवीधर
कम्प्युटरचे ज्ञान असणे आवश्यक
पोस्टमन आणि मेल गार्ड पदासाठी :
मान्यताप्राप्त संस्थेतून 12 वी पास असणे आवश्यक.
कम्प्युटरचे ज्ञान असणे आवश्यक
ज्या विभागात काम करण्याची वेळ येईल तेथील प्रादेशिक भाषेचे ज्ञान असणे आवश्यक.
वाहन परवाना असणे आवश्यक.
मल्टी टास्किंग स्टाफ :
मान्यताप्राप्त संस्थातून दहावी पास असणे आवश्यक
इतर पात्रतासाठी कृपया सविस्तर जाहिरात पहावी
वयोमर्यादा :
पोस्टल असिस्टंट, सॉर्टिंग असिस्टंट, पोस्टमन, मेल गार्ड पदासाठी अर्ज करणार्या उमेदवारांचे वय 18 ते 27 वर्षापर्यंत असावे.
मल्टी टास्किंग स्टाफ पदासाठी अर्ज करणार्या उमेदवारचे वय 18 ते 25 वर्षांमध्ये असणे आवश्यक आहे.
वेतन / पगार :
पोस्टल असिस्टंट (Postal Assistance) : Level 4, 25,500 ते 81,100 रुपये
सॉर्टिंग असिस्टंट (Sorting Assistant) : Level 4, 25,500 ते 81,100 रुपये
पोस्टमन ( Postman) : Level 3, 21,700 ते 69,100 रुपये
मेल गार्ड (Mail Guard) : Level 3, 21,700 ते 69,100 रुपये
मल्टी टास्किंग स्टाफ (Multi Tasking Staff) : Level1, 18,000 ते 56,900 रुपये
महत्त्वाच्या तारखा :
ऑनलाइन अर्ज प्रक्रियेला सुरुवात : 10/11/2023
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 09/12/2023
ऑनलाइन शुल्क भरण्याची शेवटची तारीख : 09/12/2023
ऑनलाइन अर्जातील चुका दुरूस्तीची तारीख : 10/12/2023 ते 14/12/2024
अर्ज शुल्क : खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना 100 रुपये आणि मागास प्रवर्गातील उमेदवारांना कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क नाही.