
Talathi Mega Bharati 2023:-महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागांतर्गत तलाठी गट क संवर्गातील एकूण 4625 पदांच्या सरळ सेवा भरती करता जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमि अभिलेख महाराष्ट्र राज्य पुणे यांच्याकडून जाहिरात प्रसिद्ध झाल्याची बातमी व्हाट्सअप वरून प्रचंड व्हायरल झालेली असून ही जाहिरात बोगस असल्याची माहिती समोर येत आहे.
या जाहिरातीमध्ये mahabhumi.gov.in या साइटवर ही जाहिरात असल्याचे नमूद करण्यात आले असून वास्तविक अशा प्रकारची कोणतीही जाहिरात या संकेतस्थळावर उपलब्ध नाही या संदर्भात अधिक चौकशी केली असता अशा प्रकारची कोणतीही जाहिरात शासनाच्या वतीने प्रसिद्ध झाली नसल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने एका वृत्तपत्राला दिलेल्या माहितीत समोर आले आहे. त्यामुळे परीक्षा देणाऱ्या उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळावर जाऊनच सदर जाहिरातीचे शहानिशा करून आपले अर्ज भरावेत अन्यथा उमेदवारांना एकहजार ते दीड हजार रुपये पर्यंतचा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागू शकतो.