केंद्रप्रमुख भरती २०२३. परीक्षा पद्धती व जिल्हानिहाय सविस्तर जाहिरात
महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हा परिषदेमधील प्राथमिक शिक्षकांना शिक्षकांना केंद्रप्रमुख पदावर विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा द्वारे निवडीद्वारे नियुक्ती देण्यासाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद मार्फत माहे जून २०२३ च्या शेवटच्या आठवड्यामध्ये केंद्रप्रमुख विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा चे आयोजन महाराष्ट्र राज्यातील विहित केंद्रांवर करण्यात येत आहे
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांच्या अधिकृत संकेतस्थळासाठी येथे क्लिक करा
प्रस्तुत परीक्षेमध्ये जिल्हा निहाय एकूण भरावयाची पदे ही २३८४ पासून सर्वाधिक पदी पुणे जिल्ह्यात १५३असून भंडारा जिल्ह्यात ३० पदे भरायचे आहेत इतर तसेच बघण्यासाठी कृपया सविस्तर जाहिरात येथे पहावी.
जिल्हा परीक्षा केंद्र निवड जिल्हा परिषद केंद्र बदलाबाबतची विनंती कोणत्याही परिस्थितीत अथवा कोणत्याही कारणास्तव मान्य करण्यात येणार नाही एखादे जिल्हा परीक्षा केंद्र कार्यान्वित होऊ शकले नाही अथवा एखाद्या जिल्हा परीक्षा केंद्रावर उमेदवारांना प्रवेश देण्याची क्षमता ओलांडली केली तर ते जिल्हा परीक्षा केंद्र निवडलेल्या उमेदवारांची बैठक व्यवस्था दुसऱ्या जिल्हा परीक्षा केंद्रावर करण्यात येईल
अर्ज सादर करण्याची प्रक्रिया व कालावधी
अनु क्र | तपशील | विहित कालावधी |
१ | ऑनलाईन अर्ज सादर करण्याची वेबलिंक | https://ibpsonline.ibps.inmscepapr23 |
२ | ऑनलाईन अर्ज करावयाचा कालावधी | दिनांक ०६/०६/२०२३ ते १५/०६/२०२३ |
३ | ऑनलाईन पद्धतीने विहित परीक्षा शुल्क भरण्याकरिता अंतिम दिनांक | दि १५/०६/२०२३ रोजी २३. वाजेपर्यंत |
४ | ऑनलाईन परीक्षेचा दिनांक | माहे जून २०२३ चा शेवटचा आठवडा (बदल होऊ शकतो) |