Crop Insurance:-राज्याने आठ फळपिकांसाठी हवामान आधारित फळ पिक विमा योजना राबविण्याचे ठरविले आहे. याप्रमाणे राज्यातील २६ जिल्ह्यांमध्ये मृग बहारातील आठ फळपिकांसाठी हवामान आधारित फळपीक योजना राबवण्यात येत असल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली आहे. यामध्ये संत्रा, मोसंबी, डाळिंब, चिकू, पेरू, सिताफळ, आणि द्राक्ष या आठ पिकांचा समावेश करण्यात आला आहे. ही योजना हवामान धोक्याच्या निकषानुसार आणि उत्पादनक्षम फळबागांनाच लागू राहणार असल्याची माहिती कृषी आयुक्तालयातील विनयकुमार आवटे यांनी दिलेली आहे.
या योजनेअंतर्गत कमी पाऊस ,जास्त पाऊस, पावसातील खंड, सापेक्ष आद्रता, किमान तापमान या हवामान पासून होणारे धोक्यांपासून या योजनेअंतर्गत संरक्षण दिले जाणार आहे.
या योजनेत कोण सहभी होऊ शकतात:-
ही योजना फळपिकांसाठी असून ऐच्छिक स्वरूपाची आहे योजनेत सहभागी होण्याबाबत अथवा न होण्याबाबत घोषणापत्र हे ज्या बँकेमध्ये पीक कर्ज खाते किसान क्रेडिट कार्ड खाते आहे तिथे जमा करणे आवश्यक आहे.
पिक विमा साठी लागणारे कागदपत्रे:-
बिगर कर्जदार शेतकरी विहित मुदतीत बँकेने किंवा ऑनलाईन फळ पिक विमा पोर्टल www.pmfby.gov.in वर विमा हप्ता जमा करून सहभाग नोंदवू शकतात. त्यासाठी आधार कार्ड, सातबारा उतारा, 8अ उतारा, पिक लागवड घोषणापत्र, फळबागेचा जिओ टॅगिंग केलेला फोटो, बँक पासबुक व, बँक खाते याबाबतची सविस्तर माहिती कॉमन सर्विस सेंटर मार्फत ऑनलाईन अर्ज करून भरता येईल.
अधिसूचित फळपीकांपैकी फक्त एकाच फळ पिकासाठी एका वर्षात एकाच क्षेत्रावर मृग अथवा आंबे बहार पैकी कोणत्याही एका हंगामासाठी विमा संरक्षण अर्ज करता येईल.
अनु.क्र | पीक / फळ | विमा रक्कम | विमा हप्ता | अंतिम दिनांक |
१ | डाळिंब | १,३०,०००/- | ६,५००/- | १४ जुलै |
२ | मोसंबी | ८०,०००/- | ४,०००/- | ३० जून |
३ | चिकू | ६०,०००/- | १३,२००/- | ३० जून |
४ | संत्री, लिंबु | ७०,०००/- ८०,०००/- | ४,५००/- ६,०००/- | १४ जून १४ जून |
६ | द्राक्ष | ३,२०,०००/- | १६,०००/- | १४ जून |
७ | सीताफळ | ५५,०००/- | ६,३२५/- | ३१ जुलै |
(वरील तक्ता फक्त पुणे जिल्ह्याकरिता. कृपया आपल्या जिल्हा कृषी अधिकारी यांच्याकडे चौकशी करावी.)