सहकार आयुक्त व निबंधक : सहकारी अधिकारी श्रेणी, वरिष्ठ लिपिक इ. : ३०९ पदसंख्या. Commissioner for Co-operation and Registrar of Co-operative Societies Recruitment 2023
सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य पुणे व अधिनस्त विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था (प्रशासन) मुंबई / कोकण /नाशिक /पुणे /कोल्हापूर/ औरंगाबाद/ लातूर /अमरावती/ नागपूर या कार्यालयांच्या आस्थापानेवरील भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील गट क संवर्गातील सहकारी अधिकारी श्रेणी एक, सहकारी अधिकारी श्रेणी दोन, सहकारी सहाय्यकारी अधिकारी/ वरिष्ठ लिपिक, उच्च श्रेणी लघुलेखक, निम्न श्रेणी लघुटंकलेखक आणि विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था लेखापरीक्षण नाशिक विभाग नाशिक या कार्यालयाचे आस्थापनेवरील लेखापरीक्षक श्रेणी दोन ही पदे सरळसेवेने भरण्याकरिता पात्र उमेदवारांकडून सहकार विभागाच्या संकेतस्थळावर (संकेतस्थळा करिता येथे क्लिककरा) फक्तऑनलाईन पद्धतीने दिनांक ०७ जुलै २०२३ रोजी दिनांक १२. ०० दिनांक २१ जुलै २०२३ रात्री २३. ५९ वाजेपर्यंत अर्ज मागण्यात येत आहे. त्यानंतर सदर वेब लिंक बंद होईल. या पदांकरिता पात्र असणारे महाराष्ट्राचे शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग महाराष्ट्र शासन क्रमांक -मकसी-१००७/प्र क्र ३६/का.३६, दिनांक १० जुलै,२००८ नुसार महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातील महाराष्ट्र शासनाने दावा सांगितलेल्या ८६५ गावातील मराठी भाषिक उमेदवारी अर्ज करू शकतील. सदर पदांवरील भरतीकरिता ऑनलाइन पद्धतीने महाराष्ट्रातील निश्चित केलेल्या केंद्रांवर घेण्यात येईल. ऑनलाईन परीक्षेची तारीख सहकार विभागाच्या संकेतस्थळावर यथावकाश प्रसिद्ध करण्यात येणार आहे. मुख्य प्रक्रिया संदर्भातील सर्व कार्यक्रम कार्यक्रमातील बदल सूचना वगैरे या संकेतस्थळावर वेळोवेळी प्रसिद्ध करण्यात येणार आहेत उमेदवारांनी कोणते पत्रकार करण्यात येणार नसून या संख्येचा वर्ग प्रसारित करण्यात येणाऱ्या सूचनांची दखल घेऊन त्यानुसार कार्य करण्याची दक्षता उमेदवारी स्वतः घ्यायची आहे.
सहकार आयुक्त व निबंधक विभागांतर्गत एकूण ३०९ पदांच्या भरती करिता सहकारी अधिकारी श्रेणी, वरिष्ठ लिपिक इ. ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागित आहे.
एकूण पदसंख्या: ३०९ पदसंख्या.
पद क्रमांक -पदांचे नाव -पदसंख्या -शैक्षणिक अर्हता खालील प्रमाणे
०१) सहकार अधिकारी श्रेणी – १ (Associate Officer Gr-I)
पदसंख्या-४२
उमेदवार मान्यता प्राप्त विद्यापीठाची कला (अर्थशास्त्रासह)/ वाणिज्य/ विज्ञान/ विधी/ कृषी शाखेतील पदवी किमान द्वितीय श्रेणीतून उत्तीर्ण असावा.
०२) सहकारी अधिकारी श्रेणी २ / Associate Officer Grade II
पदसंख्या-६३
उमेदवार मान्यता प्राप्त विद्यापीठाची कला (अर्थशास्त्रासह)/ वाणिज्य/ विज्ञान/ विधी/ कृषी शाखेतील पदवी उत्तीर्ण असावा.
०३) लेखापरिक्षक श्रेणी २ / Auditor Grade II
पदसंख्या-०७
उमेदवार मान्यता प्राप्त विद्यापीठाची वाणिज्य शाखेकडील ऍडव्हान्स अकौंटन्सी व ऑडिटिंग या विषयासह बी. कॉम पदवी किमान द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण किंवा मुंबई विद्यापीठाची फायनान्शियल अकौंटन्सी व ऑडिटिंग या विषयासह बी. कॉम पदवी किमान द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण असावा.
०४) सहाय्यक सहकारी अधिकारी/ वरिष्ठ लिपीक / Assistant Co-Operative Officer/Senior Clerk
पदसंख्या-१५९
उमेदवार मान्यता प्राप्त विद्यापीठाची कला/ वाणिज्य/ विज्ञान/ विधी/ कृषी शाखेतील पदवी उत्तीर्ण असावा.
०५) उच्च श्रेणी लघुलेखक / High Grade Stenographer
पदसंख्या-०३
उमेदवार १० वी उत्तीर्ण असावा.
उमेदवाराने १२० श.प्र.मि. गतीचे लघुलेखन व ४० श.प्र.मि. गतीचे इंग्रजी टंकलेखन किंवा ३० श.प्र.मि. गतीचे मराठी टंकलेखन केलेले असणे आवश्यक आहे.
०६) निम्न श्रेणी लघुलेखक / Lower Grade Stenographer-
पदसंख्या-२७
उमेदवार १० वी उत्तीर्ण असावा.
उमेदवाराने १०० श.प्र.मि. गतीचे लघुलेखन व ४० श.प्र.मि. गतीचे इंग्रजी टंकलेखन किंवा ३० श.प्र.मि. गतीचे मराठी टंकलेखन केलेले असणे आवश्यक आहे.
०७) लघुटंकलेखक / Stenographer
पदसंख्या-०८
उमेदवार १० वी उत्तीर्ण असावा.
उमेदवाराने ८० श.प्र.मि. गतीचे लघुलेखन व ४० श.प्र.मि. गतीचे इंग्रजी टंकलेखन किंवा ३० श.प्र.मि. गतीचे मराठी टंकलेखन केलेले असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा:
• खुला प्रवर्ग – १८ – ३८ वर्षे.
• राखीव प्रवर्ग –१८ – ४३ वर्षे.
परीक्षा शुल्क:
अमागास -रु. १०००/-
मागासवर्गीय / EWS / अनाथ / दिव्यांग/ माजी सैनिक -रु. ९००/-
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
सविस्तर जाहिरात बघण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या तारखा:
• ऑनलाईन अर्ज करण्याची सुरुवात – ०७ जुलै २०२३ -रात्री १२. ०० पासून
• ऑनलाईन पद्धतीने शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक- २१ जुलै २०२३- रात्री ११. ५९ पर्यंत .