Brihan Mumbai Mahanagarpalika (MCGM) Recruitment 2023 | BMC Bharti 2023
BMC Bharti – MCGM Bharti 2023 – बृहन्मुंबई महानगरपालिका “कनिष्ठ लघुलेखक (मराठी आणि इंग्रजी)” या पदांसाठी रिक्त जागा पूर्ण करण्यासाठी नवीन भरती जाहीर करते. पात्र उमेदवारांना त्यांचे अर्ज www.portal.mcgm.gov.in या वेबसाइटद्वारे ऑनलाइन सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिका (MCGM), मुंबई द्वारे 11ऑगस्ट 2023 च्या जाहिरातीत एकूण 226 रिक्त पदांची घोषणा करण्यात आली आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी तपशीलवार जाहिरात काळजीपूर्वक वाचा. अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 4 सप्टेंबर 2023 आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई भरती 2023
पदाचे नाव: कनिष्ठ लघुलेखक (मराठी आणि इंग्रजी).
रिक्त पदे: 226 पदे.
नोकरी ठिकाण: मुंबई.
वयोमर्यादा: खुल्या प्रवर्गाकरीता 38 वर्षापेक्षा जास्त नसावे व मागासवर्गीय उमेदवारांच्या बाबतीत 43वर्षापेक्षा जास्त नसावे.
शैक्षणिक पात्रता–
कनिष्ठ लघुलेखक (इंग्रजी): 10वी पास आणि इंग्रजी टायपिंग 40 WPM आणि इंग्रजी लघुलेखक 80 WPM आणि MS-CIT.
कनिष्ठ लघुलेखक (मराठी): 10वी पास आणि मराठी टायपिंग 30 WPM आणि मराठी लघुलेखक 80 WPM आणि MS-CIT.
वेतन/ मानधन: M15 (Pay Matrix ) रु. 25,500 /- ते रु.81,100/-.
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन.
अर्ज शुल्क–
खुल्या प्रवर्गातील उमेदवार: रु.१००० /- ( सर्व करासहित)
मागास / इतर मागासप्रवर्गातील उमेदवार: रु. ९०० /- ( सर्व करासहित)
अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख: 15 ऑगस्ट 2023.
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 04 सप्टेंबर 2023.