Breaking News :- सहकार विभागातील विविध खालील पदे भरण्याकरिता दिनांक ०६ जुलै २०२३ रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. सादर जाहिरातीस अनुसरून अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख २१ जुलै २०२३ अशी होती. परंतु दिनांक २१ जुलै २०२३ रोजी अर्ज करण्यासाठीचे संकेतस्थळ काही तांत्रिक कारणास्तव कार्यान्वित नसल्यामुळे उमेदवारांना अर्ज करण्यात अडचण येऊन अर्ज करता आले नाही. हि बाब विचारात घेऊन राज्यशासनाच्या सहकार विभागाने एक निवेदन प्रसिद्ध करून अर्ज भरण्यासाठी मुदत वाढ दिल्याचे प्रसिद्ध केले आहे. सादर मुदतवाढ हि दिनांक २४ जुलै २०२३ रोजी रात्री ११.५९ पर्यंत दिलेली असून दिनांक ०६ जुलै २०२३ रोजी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीतील इतर अटी व शर्ती कायम असल्याचेही या निवेदनात प्रसिद्ध करण्यात आले आहे.
