मित्रांनो सरळ सेवा भरती 2023 तलाठी संवर्ग करता तलाठी या पदासाठी अर्ज सादर करण्यासंबंधी मोठी अपडेट समोर आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागामार्फत दिनांक 17 जुलै 2023 रोजी परिपत्रक काढून ही मोठी अपडेट देण्यात आली आहे. महसूल व वन विभागामार्फत तलाठी संवर्गातील रिक्त पदे भरण्या कामी दिनांक 26/06/2023 पासून उमेदवारांची नोंदणी ऑनलाईन अर्ज स्वीकृती प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. जाहिरातीत नमूद केल्यानुसार ऑनलाईन अर्ज सादर करण्या कामी व ऑनलाइन शुल्क भरणे कामी दिनांक 17 जुलै 2023 रोजी 23.55 पर्यंत मुदत देण्यात आलेली होती. तथापि प्रशासकीय कारणास्तव तलाठी भरती कामी ऑनलाईन अर्ज सादर करण्याचा व ऑनलाईन शुल्क जमा करण्या कामी पुढील प्रमाणे मुदत वाढ देण्यात येत आहे
1.अर्ज सादर करण्याचा कालावधी- दिनांक 26 जुन 2023 रोजी पासून दिनांक 18 जुलै 2023 रोजी रात्री 23.55 वाजेपर्यंत
2.ऑनलाईन पद्धतीने विहित परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम -दिनांक 20 जुलै 2023 रोजी रात्री 23 वाजून 55 पर्यंत
महसूल व वन विभागाच्या मुदतवाढीचे परिपत्रक बघण्यासाठी येथे क्लिक करा
तलाठी भरती कामी वरील प्रमाणे दिलेली मुदतवाढ अंतिम असून यानंतर कोणत्याही परिस्थिती मुदतवाढ देण्यात येणार नसल्याचे या परिपत्रकाद्वारे महाराष्ट्र शासनाच्या महसूल वनविभाग मार्फत प्रसिद्ध करण्यात आले आहे