Biparjoy Cyclone:- बिपरजॉय चक्रीवादळ (Biparjoy Cyclone) अरबी समुद्रामध्ये तीव्र झाले असून त्याचा परिणाम केरळ आणि मुंबईच्या समुद्रात दिसू लागला आहे. भरती ओहोटीच्या वेळी येणाऱ्या उंच लाटा समुद्रात उसळत असून बिपरजॉय मुंबईपासून 290 ते 300 किलोमीटर असण्याचे शक्यता आहे. चक्रीवादळामुळे जोरदार वारा आणि पावसाच्या हालचाली राज्यांमध्ये सुरू झाल्या असून काल रात्री मुंबईतील अनेक भागात मुसळधार पाऊस झाला. चक्रीवादळ गुजरातच्या कच्छ जिल्ह्यातून पाकिस्तान कडे जाणार असल्याचे हवामान खात्यातर्फे सांगण्यात आले आहे.
जाणून घ्या बिपरजॉय चक्रीवादळाचे नाव कसे ठरले?
अनेकांच्या मनात प्रश्न पडला असेल की या वादळांची नावे कशी आणि कोठे ठेवले जातात विशेष म्हणजे या चक्रीवादळांची नावे हटके आणि खास असतात.
चला तर मग जाणून घेऊयात वादळाची नावे कशा पद्धतीने ठेवले जातात आणि याची प्रतिक्रिया नेमकी काय आहे.
हवामान खात्याने आतापर्यंत 169 वादळांची नावे जाहीर केली असून या नावांना जागतिक मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट पॅनलने एप्रिल 2019 मध्ये मान्यता दिली आहे. या यादीनुसारच येणाऱ्या वादळाचे नाव बीपरजॉयअसे ठेवण्यात आले आहे.
बिपरजॉय नाव कोणी आणि कसे दिले याचा नेमका अर्थ काय?
पेपर जॉय या चक्रीवादळाचे नाव यावेळी बांगलादेश ने ठरविले असून वादळांना नाव देण्याची पद्धत अटलांटिक प्रदेशात 1953 मध्ये मध्ये झालेल्या कराराद्वारे करण्यात आली तसेच हिंदी महासागर क्षेत्रात याची सुरुवात 2004 मध्ये झाली आहे. सर्वात महत्त्वाच म्हणजे भारताच्या पुढाकारांने पुढील आठ देशांनी वादळाना नाव देण्यास सुरुवात केली यामध्ये भारत पाकिस्तान श्रीलंका बांगलादेश मालदीव म्यानमार ओमान आणि थायलंड या देशांचा समावेश होतो
बिपरजॉय चा नेमका अर्थ काय?
वादळांना दिलेलं नावाचा एक विशेष अर्थ असतो जो त्या देशाची भाषा संस्कृती परंपरा दर्शवतो. बिपरजॉय हे नाव बांगलादेश ने दिलेले असून याचा अर्थ आपत्ती असा होतो
चक्रीवादळांची नावे कशा पद्धतीने आणि कोणत्या प्रक्रियेने ठरवले जातात?
हवामान खात्याने आतापर्यंत 169 ववादळांची नावे जाहीर केली असून या नावांना जागतिक मेट्रोलॉजीकल डिपार्टमेंटच्या पॅनलने एप्रिल 2019 मध्ये मान्यता दिलेली आहे या यादीतून येणाऱ्या वादळाचे नाव ठेवण्यात येतात.
वादळांना नाव देण्याच्या प्रक्रियेत सहभागी असलेल्या 13 देशांनी 13 नावे दिली असून एकूण 169 नावांची यादी तयार करण्यात आली आहे आतापर्यंत भारताने 13 वादळांची नावे दिली असून त्यामध्ये प्रामुख्याने प्रभंजन घुरणी अंबुध जलधी आणि वेला यांचा समावेश आहे नामकरण प्रक्रियेत सदस्य देशांनी त्यांच्या वतीने दिलेल्या नावांची यादी त्या देशांच्या वर्णमालानुसार (Alphabetical) तयार केली जातात वर्णमालेनुसार प्रथम बांगलादेश, नंतर भारत, नंतर इराण, आणि इतर देशांची नावे दिली जातात त्याचप्रमाणे वादळी चक्रीवादळांची नावे त्यांनी सुचविलेल्या नावावरून ठेवण्यात येतात.