Adivasi Vibhag Bharti 2023 | आदिवासी विकास विभाग भरती 2023 | 602 जागांसाठी मेगा भरती
आदिवासी विकास विभागांतर्गत आयुक्त, आदिवासी विकास विभाग, महाराष्ट्र राज्य, नाशिक यांच्या अंतर्गत तसेच नियुक्ती प्राधिकारी अपर आयुक्त, नाशिक/ठाणे/अमरावती/नागपूर यांच्या आस्थापनेवरील गट (ब) अराजपत्रित व गट क संवर्गातील सरळसेवा कोट्यातील विविध संवर्गातील 602 पदांच्या सरळसेवा भरतीकरिता पात्र उमेदवारांकडून आदिवासी विभागाच्या https://tribal.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर फक्त ऑनलाइन पद्धतीने दिनांक 23 नोव्हेंबर 2023 ते 13 डिसेंबर 2023 या कालावधीत अर्ज मागविण्यात येत आहेत. सदर पदांच्या भरतीकरिता महाराष्ट्रातील निश्चित केलेल्या परीक्षा केंद्रावर ऑनलाइन CBT (Computer Based Test) परीक्षा घेण्यात येतील.
पद आणि पदसंख्या
1)उच्चश्रेणी लघुलेखक -03
2)निम्नश्रेणी लघुलेखक -13
3)वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक -14
4)संशोधन सहाय्यक -17
5)उपलेखापाल/मुख्य लिपिक -41
6)वरिष्ठ लिपिक/सांख्यिकी सहाय्यक -187
7)लघुटंकलेखक- 5
8)गृहपाल (पुरुष) -43
9)गृहपाल (स्त्री) -25
10)अधीक्षक (पुरुष) -26
11)अधीक्षक (स्त्री) -48
12)ग्रंथपाल -38
13)प्रयोगशाळा सहाय्यक -29
14)आदिवासी विकास निरीक्षक- 08
15)सहाय्यक ग्रंथपाल -01
16)प्राथमिक शिक्षण सेवक (मराठी माध्यम) -27
17माध्यमिक शिक्षण सेवक (मराठी माध्यम) -15
18)उच्च माध्यमिक शिक्षण सेवक -14
19)प्राथमिक शिक्षण सेवक (इंग्रजी माध्यम)- 48
एकूण -602
ऑनलाइन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरू होण्याचा दिनांक- 23/11/23 (दुपारी १५.०० वा. पासून)
ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करण्याचा व विहित परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक -13/12/23 (रात्री २३.५५ पर्यंत)
वयोमर्यादा
खुला प्रवर्ग- 18 ते 38 वर्षे
मागास प्रवर्ग-18 ते 43 वर्षे
कृपया अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी मूळ जाहिरात नीट वाचावी व त्यानुसार अर्ज करावा.