ITR Filling Due Date: आर्थिक वर्ष 2022-23 साठी प्राप्तीकर रिटर्न भरण्यासाठी 31 जुलै 2023 ही अंतिम दिनांक असून त्यासाठी आता केवळ तीन दिवस शिल्लक राहिलेले आहेत त्यामुळे करदात्यांनी या महत्त्वाच्या तारखेकडे दुर्लक्ष न करता आपल्या ITR रिटर्न लवकरात लवकर भरावे. यावर्षी मुदत वाढवली जाणार नसल्याचे सरकारने आधीच सुचित केले आहे
27 जुलै 2023 पर्यंत दाखल केलेल्या 5.03 कोटी लोकांनी ITR दाखल केली असून त्यापैकी 4.46 कोटी ITR इ व्हेरिफाइड झाले आहेत म्हणजेच 80 टक्क्यांहून अधिक इ व्हेरिफाइड झाल्याचे आयकर विभागाने ट्विटद्वारे सांगितले आहे
ITR दाखल करण्याची अंतिम मुदत: पगारदार कर्मचारी आणि ज्यांना 2023 24 या वर्षासाठी ज्यांच्या खात्याचे लेखापरीक्षण करण्याची गरज नाही अशांसाठी आयटीआर दाखल करण्याचे अंतिम तारीख 31 जुलै 2023 आहे
लोकल सर्कल यांनी शुक्रवारी केलेल्या सर्वेक्षणानुसार 14 टक्के करदाते त्यांची अंतिम मुदत चुकू शकते तर पावसामुळे व पुरामुळे 27 टक्के लोकांचे रिटर्न भरणे अजूनही बाकी आहे. 14 टक्के होऊन अधिक कारदात्यांनी कबूल केले आहे की त्यांचे 31 जुलै ची अंतिम मुदत पूर्ण करू शकणार नाही तसेच 12000 लोकांपैकी 27% लोकांनी कबूल केल आहे की त्यांचे ITR अजूनही भरायचे बाकी आहे
31 जुलै 2023 आयटीआय दाखल करण्याची अंतिम मुदत चुकल्यास काय होईल?
जर तुमची 31 जुलै ची तारीख चुकली असेल तर तुम्ही तेजवर उशिरा रिटर्न विलंब शुल्कासह भरू शकता.