| FSSAI Bharti 2024: सहायक संचालक आणि प्रशासकीय अधिकारी पदांची भरती अंतिम दिनांक 14 जुलै 2024    | IBPS Clerk Recruitment 2024: Apply Now for Over 6128 Vacancies in Top Indian Banks! -अंतिम दिनांक 21 जुलै 2024    |MahaTransco Engineer Recruitment 2024 | महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीत विविध पदांसाठी अर्ज करा- अंतिम दिनांक 31 जुलै 2024    | कारागृह विभागात लिपिक पदासह अन्य पदाची भरती- अंतिम दिनांक 21 जानेवारी 2024
Join Our WhatsApp Group!

PM Fasal Bima Yojana | प्रधानमंत्री पिक विमा योजना | New Update | Last Date 31 July 2023 |

PM Fasal BIma Yojana :- महाराष्ट्रात अतिवृष्टी अवकाळी पाऊस व दुष्काळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. पीक विमा योजना अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना फायद्याची ठरली आहे.


योजनेच्या प्रमुख बाबी


सहभाग प्रक्रिया:-


विमा पात्र शेतकरी : कर्जदार बिगर कर्जदार भाडेपट्टीवर शेती करणारे इत्यादी सर्व शेतकरी
कर्जदार शेतकरी:- प्रधानमंत्री पिक विमा योजना कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी ऐच्छिक आहे तथापि कर्जदार शेतकऱ्यांना आपल्या अधिसूचित पिकांचा विमा करायचा नसेल त्यांनी योजनेत सहभागाच्या अंतिम दिनांक च्या सात दिवस आधी संबंधित बँकेत विहित नमुन्यातील घोषणापत्र भरून देणे आवश्यक आहे अन्यथा त्यांच्या अधिसूचित होते त्या पिकांचा विमा संबंधित बँकेमार्फत करण्यात येईल.


बिगर कर्जदार शेतकरी :ऐच्छिक :-बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी विहित नमुन्यातील विमा प्रस्ताव पत्रक पूर्णतः भरून सातबारा उतारा, आधार कार्ड, बँक पासबुक, पेरणी घोषणापत्र व पीक विमा हफ्ताची रक्कम आपले बँक खाते असलेल्या बँक शाखेत अथवा सीएससी केंद्रात अंतिम मुदतीपूर्वी जमा करावी आणि कुळाने अगर भाडेपट्टी कराराने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनी विमा करतेवेळी नोंदणी कृत केलेला भाडेपट्टी करार रजिस्टर एग्रीमेंट अपलोड करणे बंधनकारक आहे.


शेतकऱ्यांसाठी पिक विमा हप्ता फक्त एक रुपया प्रति अर्ज


विमा संरक्षित बाबी :-योजनेच्या मार्गदर्शक सूचनेनुसार अर्जदार शेतकऱ्यांनी स्थानिक नैसर्गिक आपत्ती (गारपीट, भूस्खलन,विमा संरक्षित क्षेत्र जलमय झाल्यास,ढगफुटी वीज कोसळल्यामुळे लागणारी नैसर्गिक आग) व काढणी पश्चात नुकसान भरपाई (गारपीट, चक्रीवादळ, चक्रीवादळामुळे आलेला पाऊस व बिगर मोसमी पाऊस) या बाबी अंतर्गत सुकवणीसाठी शेतात पसरवून ठेवलेल्या अधिसूचित पिकांचे काढणीनंतर 14 दिवसांपर्यंत झालेल्या नुकसानीची पूर्व सूचना नुकसानीच्या 72 तासाच्या आत क्रॉप इन्शुरन्स ॲप किंवा विमा कंपनीचा टोल फ्री क्रमांक/ बँक/ संबंधित बँक/ कृषी विभाग यांना द्यावी सदरची जोखीम केवळ अधिसूचित क्षेत्रातील अजून सूचित पिकांनाच लागू होईल योजनेअंतर्गत अधिसूचित क्षेत्रात पीक कापणी प्रयोगाद्वारे निश्चित होणारी पिकांची सरासरी उत्पन्नाची उंबरठा उत्पन्नाशी तुलना करून घेणाऱ्या घटीनुसार व योजनेच्या मार्गदर्शक सूचनेच्या अधीन राहून अधिसूचित क्षेत्रात नुकसान भरपाई निश्चित केली जाते. बँक व सी एस सी केंद्रामध्ये विमा प्रस्ताव सादर करण्याची अंतिम तारीख 31 जुलै 2023


त्वरा करा !! बँक शाखा / सी.एस सी केंद्रामध्ये शेवटच्या दिवशी होणारी गर्दी टाळण्यासाठी आपल्या पिकांचा विमा अंतिम मदतीच्या आधीच होईल याची खात्री करा.


योजनेच्या अधिक माहितीसाठी योजनेची परिपत्रक व महाराष्ट्र शासनाची अधिसूचना वाचावी ती www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. अथवा जिल्हा किंवा तालुका विमा कंपनी प्रतिनिधींशी संपर्क साधावा.


महसूल मंडळांची यादी व महाराष्ट्र शासनाची अधिसूचना नजीकच्या बँक शाखेत सहकारी पतपुरवठा संस्थांकडे उपलब्ध आहे

Leave a comment