Breaking News :-महसूल विभागातील तलाठी संवर्गातील रिक्त पदे भरण्याकामी दिनांक 26 जून 2023 पासून उमेदवारांची नोंदणी व ऑनलाईन अर्ज स्वीकृतीची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे प्रथम जाहिरातीत नमूद केल्यानुसार ऑनलाइन व अर्ज सादर करण्यास आम्ही व अन्य शुल्क भरणे कामी दिनांक 17 जुलै 20023 रोजी रात्री 11. 55 मिनिटांपर्यंत मदत देण्यात आली होती. परंतु काही तांत्रिक कारणांमुळे सर्वर डाऊन असल्यामुळे ही मुदत एक दिवसांनी वाढवून दिनांक 18 जुलै 2023 रोजी रात्री 11.55 मिनिटांपर्यंत देण्यात आली होती आता राज्यात सुरू असणाऱ्या जातीवृष्टीमुळे इंटरनेट सेवा प्रभावी झाल्याने दुर्गम भागातील पैसा (PESA) क्षेत्रातील व इतर उमेदवारांना ऑनलाईन अर्ज सादर करण्यास अडचणी निर्माण झाल्याबाबत निवेदन शासन स्तरावर प्राप्त झालेले आहेत त्यामुळे तलाठी भरती कामी सर्व प्रकारच्या उमेदवारांसाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी व ऑनलाइन शुल्क जमा करण्यासाठी पुढील प्रमाणे मदत वाढ देण्यात आल्याचे राज्य शासनाच्या महसूल व वन विभागाच्या जमाबंदी आयुक्त व संचालक यांनी परिपत्रक काढून जाहीर केले आहे.
नवीन वेळापत्रक पुढील प्रमाणे
अनु क्र | तपशील | विहित कालावधी |
01 | अर्ज सादर करण्याचा कालावधी | दिं 22/07/2023 रोजी रात्री 00.05 पासून दिं 25/07/2023 रोजी रात्री 23.55 पर्यंत |
02 | ऑनलाईन पद्धतीने विहित परीक्षा शुल्क भरण्याचा कालावधी | दिं 25/07/2023 रोजी रात्री 23.55 पर्यंत |
दिनांक 26 जून 2023 रोजी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीतील इतर अटी व शर्ती कायम असल्याचेही या निवेदनात प्रसिद्ध करण्यात आले आहे.

एकूण पदसंख्या: ४६४४ पदसंख्या.
शैक्षणिक अर्हता:
कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदवीधर असावा.
मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा:
खुला प्रवर्ग : 18-38 वर्षे.
मागासवर्गीय : 18-43 वर्षे.
अपंग उमेदवार : 45 वर्षे.
परीक्षा शुल्क:
खुला प्रवर्ग – 1000 रु.
मागासवर्गीय व आ. दु. घ. – 900 रु.
वेतनश्रेणी:
उमेदवारांना रु.25500 – 81100/- अशी वेतनश्रेणी अदा केली जाईल.
महत्त्वाच्या तारखा:
ऑनलाईन अर्ज करण्याची सुरुवात – 22 जुलै 2023
ऑनलाईन पद्धतीने शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक- 25 जुलै 2023