| FSSAI Bharti 2024: सहायक संचालक आणि प्रशासकीय अधिकारी पदांची भरती अंतिम दिनांक 14 जुलै 2024    | IBPS Clerk Recruitment 2024: Apply Now for Over 6128 Vacancies in Top Indian Banks! -अंतिम दिनांक 21 जुलै 2024    |MahaTransco Engineer Recruitment 2024 | महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीत विविध पदांसाठी अर्ज करा- अंतिम दिनांक 31 जुलै 2024    | कारागृह विभागात लिपिक पदासह अन्य पदाची भरती- अंतिम दिनांक 21 जानेवारी 2024
Join Our WhatsApp Group!

Krushi Vibhag Recruitment 2023 | Extension For Online Application. | कृषी विभागात लघुलेखक पदांसाठी मोठी भरती |ऑनलाईन अर्ज  करण्याच्या मुदतीत वाढ.

Krushi Vibhag Recruitment 2023 :- राज्य शासनाच्या कृषी व पदूम विभाग अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरती (Krushi Vibhag Recruitment 2023) केली जाणार आहे. दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील गट-क मधील लघुटंकलेखक व गट-ब (अराजपत्रित) मधील लघुलेखक (निम्न श्रेणी) व लघुलेखक (उच्च श्रेणी) या संवर्गातील रिक्त पदे सरळसेवेने भरण्यात येणार आहेत.

कृषी व पदूम विभागातील कृषी आयुक्तालय व अधिनस्त विभागीय कार्यालयाच्या आस्थापनेवरील भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील सदर पदांसाठी पात्र उमेदवारांकडून कृषी विभागाच्या www.krishi.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर फक्त ऑनलाईन पद्धतीने दिनांक 13 जुलै 2023 पासून दिनांक 22 जुलै 2023 या कालावधीत मागविण्यासाठी लिंक परत खुली करण्यात येत आहेत. (Krushi Vibhag Recruitment 2023)

अर्ज शुल्क –

अमागास – रु.720/-

गासवर्गीय / आ. दु.घ/ अनाथ/दिव्यांग/माजी सैनिक – रु. 650/-

वयोमर्यादा –

खुल्या प्रवर्गासाठी – 18 ते 40 वर्षे

मागासवर्गीय प्रवर्गासाठी – 18 ते 45 वर्षे

शैक्षणिक पात्रता

लघुटंकलेखक – माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण. लघुलेखनाचा वेग किमान 80 शब्द प्रति मिनिट आणि इंग्लिश टंकलेखनाचा वेग किमान 40 शब्द प्रति मिनिट किंवा मराठी टंकलेखनाचा वेग किमान 30 शब्द प्रति मिनिट, या अर्हतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र.

लघुलेखक (निम्न श्रेणी) – माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण. लघुलेखनाचा वेग किमान 100 शब्द प्रति मिनिट आणि इंग्लिश टंकलेखनाचा वेग किमान 40 शब्द प्रति मिनिट किंवा मराठी टंकलेखनाचा वेग किमान 30 शब्द प्रति मिनिट, या अर्हतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र.

लघुलेखक (उच्च श्रेणी) – माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण. लघुलेखनाचा वेग किमान 120 शब्द प्रति मिनिट आणि इंग्लिश टंकलेखनाचा वेग किमान 40 शब्द प्रति मिनिट किंवा मराठी टंकलेखनाचा वेग किमान 30 शब्द प्रति मिनिट, या अर्हतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र.

वेतनश्रेणी

लघुटंकलेखक – S-8 : 25500-81100 अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे इतर देय भत्ते.

लघुलेखक (निम्न श्रेणी) – S-14 : 38600- 122800 (सुधारित – S-15 : 41800-132300) अधिक महागाई भत्ता नियमाप्रमाणे इतर देय भत्ते.

लघुलेखक (उच्च श्रेणी) – S-15 : 41800-132300 (सुधारित – S-16 : 44900-142400) अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे इतर देय भत्ते.

मुदतवाढीचे शुद्धिपत्रकKrushi Vibhag Bharti 2023

PDF जाहिरातKrushi Vibhag Recruitment 2023

ऑनलाईन अर्ज करा Maharashtra Agriculture Department Recruitment 2023

Leave a Comment