
State Excise Recruitment Stay:-राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिपत्याखाली लघुलेखक लघु टंकलेखक जवान वाहन चालक आणि चपराशी या संवर्गातील सरळ सेवेची रिक्त पदे भरण्याकरिता राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकृत www.ststeexcise.maharashtra.gov.in संकेतस्थळावर दिनांक 30/ 5 /2023 रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती.
या जाहिरातीमध्ये जवान या पदाकरिता राज्यस्तरीय संवर्ग घोषित करून सदरील भरती प्रक्रिया व वाढीव पदे व त्या अनुषंगाने संभाव्य रिक्त पदे विचारात घेऊन एकत्रित भरती प्रक्रिया राबविण्यात आहे.
त्या अनुषंगाने वाढीव पदांचा आढावा घेऊन पुढील कारवाई करण्यात येत असल्यामुळे सदरची संपूर्ण भरती प्रक्रिया तात्पुरत्या स्वरूपात शासन निर्देशांमुळे स्थगिती देण्यात आल्याचे राज्य उत्पादन शुल्क विभागातर्फे प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आले आहे.
पुढे असे नमूद करण्यात आले आहे की ज्या उमेदवारांनी अर्ज भरले आहेत ते अर्ज ग्राह्य धरले जातील तसेच अर्जामध्ये जर तांत्रिक दुरुस्ती करणे गरजेचे असल्यास तशा सूचना यथावकाश सविस्तर कळविण्यात येतील.
भरती प्रक्रियेची सुधारित जाहिरात सुद्धा लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल.