Mahadiscom bharti 2024:-महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादितच्या कार्यकाक्षेत येणाऱ्या कार्यालयातील विद्युत सहायक पदाची वेतन गट 4 मधील विभाग स्तरीय सेवाजेष्ठतेतील पदे सरळ सेवा भरतीद्वारे तीन वर्षाच्या कंत्राटी कालावधीसाठी भरण्याकरिता अर्हता प्राप्त उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज ऑनलाईन पद्धतीने मागविण्यात येत आहेत विद्युत सहाय्यक या पदाचा तीन वर्षाच्या कंत्राटी कालावधी समाधानकारकरीत्या पूर्ण केल्यानंतर कंपनीच्या नियमांच्या अधीन राहून सदर उमेदवारांना तंत्रज्ञ या नियमित पदावर सामावून घेण्यात येईल. Mahavitaran bharti 2024.
पदाचे नाव व एकूण पदसंख्या
विद्युत सहाय्यक- 5347 पदे
दिनांक 29 12 2023 अखेर शैक्षणिक अर्हता
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांचे 10 +2 बंधांमधील माध्यमिक शाळांत परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण
आणि
औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील व्यवसाय पाठ्यक्रम पूर्ण केल्यावर राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद नवी दिल्ली यांनी विजतंत्री/ तारतंत्री अथवा सेंटर ऑफ एक्सलन्स इलेक्ट्रिकल सेक्टर व्यवसायासाठी दिलेले राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण प्रमाणपत्र किंवा महाराष्ट्र राज्य व्यवसाय परीक्षा मंडळ यांनी प्रमाणित केलेले दोन वर्षाचा पदविका( वीजतंत्री /तारतंत्री) अभ्यासक्रम प्रमाणपत्र.
दिनांक 29 12 2023 अखेर वयोमर्यादा
उमेदवाराची किमान वय 18 वर्षे पूर्ण व कमाल वर्ष वय 27 वर्षे असणे आवश्यक आहे
मानधन
निवड झालेल्या उमेदवारांना खालील प्रमाणे प्रतिमाह मानधन देण्यात येईल
प्रथम वर्ष एकूण मानधन -15000
द्वितीय वर्ष एकूण मानधन -16000
तृतीय वर्ष एकूण मानधन -17000
विद्युत सहाय्यक तीन वर्षाचा कंत्राटी कालावधी समाधान कारकरी ते पूर्ण केल्यानंतर कंपनीच्या नियमानुसार सदर उमेदवारांना तंत्रज्ञ या नियमित पदावर रुपये 25880-505-28405-610-34505-710-50835 या वेतनश्रेणीमध्ये नियमित घेण्यात येईल
महत्त्वाच्या तारखा
ऑनलाईन अर्ज स्वीकृत करण्याची युआरएल लिंक कंपनीच्या संकेतस्थळावर माहे जानेवारी 2024 मध्ये प्रसिद्ध करण्यात येईल त्यासोबत ऑनलाईन अर्ज भरण्याबाबतच्या मार्गदर्शक सूचना देण्यात येतील. ऑनलाईन तांत्रिक क्षमता चाचणी ऑनलाईन एक्झाम सर्वसाधारणपणे माहे फेब्रुवारी / मार्च 2024 मध्ये घेण्यात येईल.
परीक्षा शुल्क
उमेदवारांनी खालील प्रमाणे ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्काची रक्कम भरावी
खुल्या प्रवर्ग प्रवर्गातील उमेदवारांसाठी -250 रुपये+GST
मागासवर्गीय आर्थिक दृष्ट्या दुर्बल वाहनात घटकातील उमेदवारांसाठी-रुपये 125 +GST
अधिकृत वेबसाईट-www.mahadiscom.in
सविस्तर जाहिरात पाहण्यासाठी :-येथे क्लिक करा