
Weather Forcast:-राज्यात तीन तारखेपासून मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली आहे. या पावसामुळे काही ठिकाणी गारपीट झालेली दिसून येते.
पुढील 24 तासात राज्यात नाशिक परभणी नंदुरबार धुळे आणि राज्याच्या काही अंतर्गत भागात गारपीट hail झाल्याचे दिसून आले. मुंबईतील प्रादेशिक हवामान केंद्राच्या अंदाजानुसार पालघर रत्नागिरी नंदुरबार धुळे अहमदनगर सिंधुदुर्ग नाशिक पुणे जळगाव सातारा औरंगाबाद सोलापूर सांगली येथे काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस तसेच मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे.
मराठवाडा विदर्भात बहुतेक ठिकाणी, मध्य महाराष्ट्रातील विविध भागात पावसाचा thunderstorm इशारा तसेच पश्चिम महाराष्ट्र ,विदर्भात व मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
महाराष्ट्रातील प्रसिद्ध हवामान तज्ञ श्री पंजाबराव साहेब डक यांच्या अंदाजानुसार महाराष्ट्रात पुढील आठवडा म्हणजेच तीन तारखेपासून ते नऊ तारखेपर्यंत पूर्ण महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे. महाराष्ट्र मध्ये weather forecast मान्सून monsoonआठ किंवा नऊ तारखेला दाखल होण्याची शक्यताही त्यांनी वर्तवली आहे . त्यामुळे शेतकऱ्यांनी आपापली शेतीची मशागतीची कामे उरकून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.