Nagarparishad Revised Timetable Out | नगरपरिषद सुधारित वेळापत्रक जाहीर
Nagarparishad Revised Timetable Out:- नगरपरिषद प्रशासन संचालनालय अंतर्गत महाराष्ट्र नगरपरिषद राज्यसेवा संवर्गांमधील विविध पदे नामनिर्देशनाने / सरळ सेवेने भरण्याच्या अनुषंगाने महाराष्ट्र नगरपरिषद राज्यसेवा गट क परीक्षा 2023 परीक्षेचे सत्रनिहाय वेळापत्रक संचालनालयाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले होते. त्या नुसार अभियांत्रिकी सेवा, पाणीपुरवठा जलनिस्सारण व स्वच्छता अभियांत्रिकी सेवा आणि लेखापाल लेखापरीक्षक या संवर्गच्या परीक्षा दिनांक 02 नोव्हेंबर 2023 ते 03 नोव्हेंबर 2023 या दिवशी जाहीर करण्यात आल्या होत्या.
तथापि राज्यभर सुरू असलेल्या विविध आंदोलनामुळे काही जिल्हा संचारबंदी आदेश लागू करण्यात आल्यामुळे इंटरनेट सुविधा व राज्य परिवहन महामंडळाच्या तसेच काही भागात बंद करण्यात आल्या होत्या या बाबी विचारात घेऊन संचालनालयाच्या दिनांक 16 ऑक्टोबर 2023 व दिनांक 23 ऑक्टोबर 2023 रोजीच्या परिपत्रक प्रसिद्धीपत्रकानुसार होणाऱ्या वरील परीक्षा पुढे ढकलन्याबाबत दिनांक 31 ऑक्टोबर 2023 रोजीच्या परिपत्रकानुसार पुढे धाकल्या होत्या.
आता नगरपरिषद संचालनालयाने या स्थगित करण्यात आलेल्या परीक्षांचे सुधारित वेळापत्रक जाहीर केले या परीक्षा 22 नोव्हेंबर आणि 24 नोव्हेंबर 2023 या दिवशी घेण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे.
