ZP online Exam Stay :- महाराष्ट्र शासनाच्या जिल्हा परिषदेमार्फत विविध संवर्गाच्या पद भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले होते सदर भरती प्रक्रिया ही दिनांक 7 ऑक्टोबर 2023 पासून सुरू होऊन 23 ऑक्टोबर 2023 पर्यंत प्रथम टप्प्यात असणार आहे या पद्धतीमध्ये आतापर्यंत रिंगमन, वरिष्ठ सहाय्यक, विस्तार अधिकारी, आरोग्य पर्यवेक्षक, लघुलेखक, कनिष्ठ सहाय्यक, कनिष्ठ लेखाधिकारी, कनिष्ठ अभियंता यांत्रिकी / विद्युत, तारतंत्री, जोडारी, पशुधन पर्यवेक्षक, या संवर्गासाठीची ऑनलाईन पद्धतीने प्रक्रिया परीक्षा पार पडली आहे सदर भरती प्रक्रियेमध्ये जिल्हा परिषदेने त्यांच्या संकेतस्थळावर दिलेल्या माहितीनुसार 18 ऑक्टोबर 2023 रोजी मुख्य सेविका पर्यवेक्षिका या संवर्गाची परीक्षा नियोजित वेळेनुसार 18 ऑक्टोबर 2023 रोजी घेण्याचे ठरले होते परंतु आता जिल्हा परिषद अहमदनगर यांनी त्यांच्या संकेतस्थळावर दिलेल्या माहितीनुसार दिनांक 18 ऑक्टोबर 2023 रोजी ची मुख्य सेविका / पर्वेक्षिका ही परीक्षा तारपती तात्पुरती स्थगित केल्याची जाहीर केले आहे परंतु 21 ऑक्टोबर 2023 व 23 ऑक्टोबर 2023 रोजी स्थापत्य कनिष्ठ अभियंता तसेच 22 ऑक्टोबर 2023 रोजी च्या औषध निर्माण अधिकारी या परीक्षेबद्दल कोणतेही विधान केलेले नाही म्हणजेच या परीक्षा नियोजित वेळेनुसारच होणार असल्याचे समजते तरी उमेदवारांनी आपल्या माहितीसाठी व खात्री करून घेण्यासाठी अधिकृत जिल्हा परिषद च्या संकेतस्थळावर भेट देऊन खात्री करावी
